मुख्यमंत्र्यांवर बंगले लपवण्याचा आरोप, तर मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप – सोमय्या

dhananjay munde vs kirit somaiya

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री धनजंय मुंडे यांच्याविरोधात एका युवतीने अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. यावरून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी तक्रार केलेल्या युवतीच्या बहिणीसोबत आपण परस्पर सहमतीने संबंधांत होतो अशी माहिती दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या आरोपांवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जळजळीत टीका केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांवर १९ बंगलो लपवण्याचा आरोप आहे तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप ! या ठाकरे सरकारची दयनीय अवस्था झाली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरेवर पाणी फिरवण्याचा काम हे ठाकरे सरकार करत आहे.’ असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, त्या युवतीने केलेली तक्रार ही खोटी असून या द्वारे मला ब्लॅकमेल केले जात असल्याचे मुंडे यांचे म्हणणे आहे. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर विविध माध्यमांत आणि सोशल मीडियात धनजंय यांच्याविरोधात टीकेचे रान उठले आहे. तक्रारीच्या 24 तासानंतर मुंडे यांनी सोशल मीडियाद्वारे आपले म्हणणे मांडले आहे.

‘करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.’ असं देखील धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांची संपूर्ण फेसबुक पोस्ट –

 

महत्वाच्या बातम्या