पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे आमदार काढणार ‘माफी यात्रा’

टीम महाराष्ट्र देशा : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने अपेक्षित यश मिळवले होते. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. २०२१ साली होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आपला गढ राखण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु करत माफी यात्रेचे आयोजन केले आहे.

Loading...

तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी माफी यात्रेचे आदेश दिले आहेत. तसेच जे पक्षापासून दुरावले आहेत, त्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न करावेत, असेही ममतांनी आमदारांना सांगितले आहे. ममतांनी सांगितल्याप्रमाणे तृणमूलचे सर्व आमदार राज्यभर माफी यात्रा काढणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत तृणमूलला नक्कीच याचा फायदा होणार आहे.

दरम्यान, या यात्रेत ते सामान्य नागरिकांना भेटणार आहेत. तसेच त्यांची माफी मागणार आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाने गमावलेला विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न तृणमूलचा असणार आहे.Loading…


Loading…

Loading...