सीबीआयच्या कामात राजकीय हस्तक्षेप नको, सरन्यायाधीश गोगोईंनी व्यक्त केली नाराजी

टीम महाराष्ट्र देशा: सत्तेवर असणारे सरकार विरोधकांना धमकावण्यासाठी सीबीआयचा वापर करत असल्याची तक्रार कायम केली जाते. मोदी सरकारवर देखील सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून अनेकवेळा करण्यात आला आहे. दरम्यान, आता सीबीआयच्या कामात राजकीय हस्तक्षेप नको, अशी भावना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनातील कार्यक्रमात ते बोलत होते.

राजकीय हस्तक्षेप झाला नाही तर सीबीआयला चांगले काम करता येते. राजकीय हस्तक्षेप झाल्यास सीबीआय चांगली कामगिरी दाखवू शकत नाही. त्यामुळे न्यायालयात देखील अशी प्रकरणे निकाली लागू शकत नाहीत, अशी खंत गोगोई यांनी यावेळी व्यक्त केली.

Loading...

सीबीआयला कॅगप्रमाणे स्वायत्तता मिळायला हवी, अनेकवेळा सीबीआयच्या कामात कुठेतरी राजकीय दबाव असल्याचं दिसून येत. सीबीआयमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी अनेकदा न्यायालयाकडून निर्देश देण्यात आलेत. सीबीआय विभागात १५ टक्के वरिष्ठ पदं, २८ टक्के तांत्रिक पदं आणि ५० टक्के कायदेशीर जागा रिकाम्या असल्यामुळे अधिकाऱ्यांवर कामाचा ताण असतो, असेही गोगोई म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई