२० वर्ष न्यायसंस्थेत काम केल्याचं हे फळ आहे का ? – सरन्यायाधीश रंजन गोगोई

टीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. मात्र महिलेचे सर्व आरोप गोगोई यांनी फेटाळून लावले आहेत. न्यायसंस्था धोक्यात आली असून. पुढच्या आठवड्यात महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे, त्यामुळे मुद्दाम अशा प्रकारचे आरोप केले जात आहे. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष सुनावणी घेण्यात आली. यावेळी गोगोई म्हणाले की, २० वर्ष न्यायसंस्थेत काम केल्याचं हे फळ आहे का? 20 वर्षानंतर आजही माझ्या खात्यात फक्त 6 लाख 80 हजार रुपये आहेत. एवढचं काय तर माझ्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याकडेही माझ्याहून अधिक पैसे आहेत. माझ्यावर कोणीही आर्थिक आरोप करु शकत नाही. त्यामुळे असे आरोप केले जात आहेत.

न्यायसंस्थेला बळीचा बकरा करता येणार नाही. काही लोकांना ही संस्था बरखास्त करायची आहे. यासाठीच अशाप्रकारचे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. असं गोगोईंनी यावेळी सांगितले. तर पुढच्या आठवड्यात काही महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी आहे त्यामुळे आपल्यावर तथ्यहीन आरोप केले जात असल्याचं ते म्हणाले.

एका महिलेने सुप्रीम कोर्टाच्या 22 न्यायाधीशांना पत्र लिहित. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपले लैंगिक छळ केला असल्याचा आरोप केला आहे.