fbpx

इव्हीएम छेडछाडीच्या आरोपांमध्ये तथ्य नाही – ओ. पी. रावत

नवी दिल्ली – पराभव सहन करू न शकणाऱ्या राजकीय पक्षांना पराभवाचे खापर फोडण्यासाठी कुणाची तरी गरज असते. अशाच राजकीय पक्षांकडून इव्हीएमला बळीचा बकरा बनवले जात आहे.जे पक्ष पराभूत होतात ते उमेदवार इव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप सर्रास करतात. मात्र इव्हीएममध्ये छेडछाड करण्याच्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान आगामी निवडणुकांमध्ये मतपत्रिका वापरण्याची शक्यता फेटाळून लावतानाचं रावत पुढे बोलताना म्हणाले की, ‘जेव्हा जेव्हा असे आरोप करण्यात आले तेव्हा प्रत्येक वेळी निवडणूक आयोगाने आपले मत मांडले आहे. आगामी काळात सर्व निवडणुका इव्हीएमने होतील आणि सर्व इव्हीएमला व्हीव्हीपँटची सुविधा असेल, त्यामुळे आपण दिलेले मत योग्य उमेदवाराला मिळाले आहे की नाही हे मतदाराला समजू शकेल, असा निर्णय गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला होता.’ असं त्यांनी यावेळी सांगितले.