मोदी सरकार कंडोमसाठी देखील आधार मागेल-पी. चिदंबरम

p-chidambaram

टीम महाराष्ट्र देशा: पुढील काही दिवसात मोदी सरकार कंडोम व सिनेमा तिकीटावर देखील आधार कार्ड सक्ती करेल अश्या शब्दात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टिका केली आहे. चिदंबरम आज आयआयटी मुंबई येथे एका कार्यक्रमात बोलत होते. आधारच्या अवाजवी सक्तीला विरोध करायला हवा, असे ते म्हणाले.

त्यांनी मोदी सरकारवर नोटाबंदी आणि वस्तू सेवा कर लागू करण्याच्या निर्णयावरूनही ताशेरे ओढले. देशाला कोणताही आर्थिक फायदा जीएसटीमुळे झालेला नाही. नोटाबंदीही फसवीच होती. नोटाबंदीचे सांगितलेले फायदे एक वर्षानंतरही दिसत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

आधारसक्तीला विरोध करण्याची भूमिका चिदंबरम् यांनी मांडल्यावर त्याला इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. नारायणमूर्ती यांनी तात्काळ विरोध केला. सामाजिक संरक्षण व्यक्तीला मिळावे म्हणून आधार कार्डचा वापर केला जात असल्यामुळे त्याला विरोध करणे योग्य नाही, असे मत त्यांनी मांडले. चिदंबरम् आणि नारायणमूर्ती यांच्यात व्यासपीठावर शाब्दिक जुगलबंदी झाली. अखेर आधारसक्तीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने न्यायालय जो निर्णय देईल तोच योग्य मानू या, अशी भूमिका चिदंबरम् यांनी मांडल्यावर या वादावर पडदा पडला.Loading…
Loading...