तुरुंगातून पी.चिदंबरम यांची सरकारवर टीका,म्हणाले….

blank

टीम महाराष्ट्र देशा:- आयएनएक्स मिडिया घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे. देशात सध्या सर्वत्र आर्थिक मंदी सुरु आहे.तर सरकारने या आर्थिक मंदीवर काय नियोजन केले  आहे.असा प्रश्न पी.चिदंबरम यांनी केला आहे. चिदंबरम यांनी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यावतीने ट्विटर पोस्ट टाकण्यास सांगितले आहे.

अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबद्दल मला तीव्र चिंता वाटते. यामुळे गरिबांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. उत्पन्न घटले, नोकऱ्या गेल्या, व्यापार मंदावला, गुंतवणूकही कमी झाली या सगळ्याचा फटका गरीब आणि मध्यम वर्गाला बसला आहे.या सगळ्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी सरकारचे नियोजन कुठे आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

गेल्या आठवड्यात चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर चिदंबरम यांनी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यावतीने ट्विट करण्याची परवानगी दिली आहे.गेल्या काही दिवसांत अनेक जण आपल्या पाठिशी उभे राहिले. त्याबद्दलही चिदंबरम यांनी त्यांचे आभार मानले आहेत.तसेच आपल्याविरुद्ध करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून खुलासा केला आहे.

दरम्यान आयएनएक्स मीडिया प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी चिदंबरम यांची तिहार तुरुंगात रवानगी केली आहे. विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी चिदंबरम यांना १४ दिवसांची १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.