चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ, एअरसेल मॅक्सिस प्रकरणात चिदंबरम सहआरोपी

टीम महाराष्ट्र देशा- एअरसेल मॅक्सिस प्रकरणी सीबीआयने दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे नाव समाविष्ट करण्यात आले असून चिदंबरम यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

जे कॉमन सेन्सनं होऊ शकलं नाही, ते गुजरातच्या निवडणुकीनं करून दाखवलं – चिदंबरम

चिदंबरम यांच्यासह सरकारी अधिकारी मिळून १७ जणांचा आरोपपत्रात समावेश आहे. चिदंबरम यांचे पूत्र कार्ती चिदंबरम यांना यापूर्वीच या प्रकरणात आरोपी बनविले आहे. आता चिदंबरम यांना या प्रकरणात सहआरोपी बनविण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालय ३१ जुलै रोजी दखल घेणार आहे.

त्यांचे बुरे दिन आले कि ‘सर्जिकल स्ट्राईक’ करतात: पी चिदंबरम

एअरसेल मॅक्सिस प्रकरणी सीबीआय आणि ईडी चौकशी करत आहेत. २००६ मध्ये चिदंबरम अर्थमंत्री असतानाचे हे प्रकरण आहे. याप्रकरणी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती यांना अटक झाली होती व नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. सप्टेंबर २०१७ मध्ये ईडीने कार्ती यांची १.१६ कोटींची संपत्तीही जप्त केली होती.