छोटा भीमने चुटकीला सोडून राजकुमारी इंदुमतीशी केले लग्न?

indu-bheem-chutki

नवी दिल्ली : छोटा भीम हे एक प्रसिद्ध कारटून आहे. यामध्ये भीमने चुटकी ऐवजी ढोलकपूरच्या राजकुमारीशी इंदुमतीशी लग्न केल्याने ‘चुटकीसाठी न्याय’ हा ट्रेंड सुरु झाला होता. नुकताच #JusticeForChutki हा ट्विटरवरील टॉप ट्रेंडपैकी एक बनला होता. बघता बघता हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला.

निसर्ग वादळाच्या संकटानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले ‘हे’ निर्देश

याबाबत ट्विटरवर अनेक मजेदार मीम्स बनवले जात आहेत. यामधून छोटा भीमचे लग्न चुटकीशी न होता इंदुमतीशी झाले, याबाबत निराशा व्यक्त केली जात आहे. छोटा भीम व चुटकी हे ‘एकमेकांसाठीच बनलेले’ आहेत यावर नेटिझन्सचा दृढ विश्वास आहे.

भाजपा नेत्या चंद्रकांता गोयल यांचे निधन

दरम्यान, छोटा भीम या कार्टून सिरीयलचे निर्माते ग्रीन गोल्ड ऍनिमेशन यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली आहे. त्यात म्हटले होते, सगळ्यांनी एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की छोटा भीममधील पात्रे ही लहान मुले आहेत. त्यात भीम, छुटकी आणि इंदुमती यांचासुद्धा समावेश आहे. सध्या जी बातमी वायरल झाली आहे ती खोटी आहे.