fbpx

छिंदम शिवप्रेमींच्या हातून सुटला, पण कैद्यांनी धुतला

श्रीपाद छिंदम

अहमदनगर: शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा अहमदनगरमधील निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला याच्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी छिंदम याला न्यायालयात आणताना कोणता गोंधळ होऊ नये यासाठी सगळी खबरदारी बाळगली, मात्र त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर तो कैद्यांनी छिंदमला चांगला चोप दिल्याची माहिती दैनिक ‘सामना’ ने दिलेल्या वृत्तानुसार समोर येत आहे.

देशभरातील शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी त्याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात दिलं आहे. शनिवारी कोर्टात हजर केल्यानंतर छिंदमला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिवरायांबद्दल अपशब्द का वापरले? असा सवाल कैद्यांनी छिंदमला विचारला. त्यानंतर कैद्यांनी त्याल चांगलाच चोपल यामुळे नगरच्या मध्यवर्ती सबजेलमध्ये एकच गोंधळ उडाला. पोलीस कर्मचाऱ्यांनी कसाबसा छिंदमला कैद्यांच्या तावडीतून सोडवले. मात्र छिंदमवर पुन्हा हल्ला होईल याची खबरदारी घेत. त्याला वेगळ्या कोठडीत ठेवण्याबाबत तुरुंग प्रशासन विचार करीत आहे.