शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम 15 दिवसांसाठी तडीपार

श्रीपाद छिंदम

टीम महाराष्ट्र देशा- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपमधून बडतर्फ केलेला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला 15 दिवसांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करा, या मागणीसाठी उद्या नगरमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती.

नगरमध्ये उद्या सकाळी 11 वाजता शिवप्रेमींच्या वतीने छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करा, या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी महाराज पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू होणार असून तो माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोडमार्गे चौपाटी कारंजा येथे येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर छिंदमला 15 दिवसांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

Loading...

दरम्यान छिंदम याने १६ फेबु्रवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छिंदम याचे दिल्ली गेट परिसरातील कार्यालय व त्याच्या घरासमोर लावलेल्या मोटारसायकलची तोडफोड केली होती. या तोडफोडप्रकरणी छिंदम याने रविवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पोलीसांनी राजेंद्र नारायण दांगट, योगेश देशमुख, स्वप्निल दगडे, गोरख दळवी, भावड्या अनभुले, चेतन शेलार, विरेश तवले, रोहित गुंजाळ, धनंजय लोकरे, बाबासाहेब रोहकले, धनवान दिघे, हरिष भांबरे, गिरीष भांबरे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

श्रीपाद छिंदम हाअहमदनगर महापालिकेचे निलंबित उपमहापौर आहे. छिंदमने त्याच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर खडसे  म्हणतात...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर
भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही; त्यांनी नसत्या उठाठेव करू नये