छिंदम महापालिकेत; नगरसेवकांनी केली गोमूत्र शिंपडण्याची मागणी

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी अटक झालेला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आज महापालिकेच्या सभेत आला. तो सभेत आल्यानं काही नगरसेवकांनी गोंधळ घातला. एका मिनिटातच तो सभेतून निघून गेला. मात्र, तो आलेल्या वाटेत गोमूत्र शिंपडावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली.

आज महापालिकेची महासभा होती. त्यात छिंदम येणार असल्याची कुणकुण लागल्याने सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. छिंदम अद्यापही नगरसेवक आहे. त्यामुळे त्याला सभेत येण्यापासून पोलीस अडवू शकत नव्हते. सभा सुरू होताच तो महापालिकेत आला. त्याने थेट पीठासीन अधिकारी असलेल्या महापौरांसमोर जाऊन एक अर्ज दिला. तो निघून गेल्यानंतरही सभागृहात गोंधळ सुरू झाला. तो आलेल्या मार्गावर गोमूत्र शिंपडावे, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली.

भाजप – कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी

पुण्यातून मुंबई, सोलापूरकडे जाणाऱ्या बस बंद

आंदोलनामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होत चाललंय : राणे