शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमची जामीनावर सुटका

अहमदनगर: शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला  १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. दरम्यान, अहमदनगर न्यायालयाच्या पत्रानंतर छिंदमला कारागृहातून जामीनावर सोडण्यात आलं आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

श्रीपाद छिंदमने शिवरायांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर राज्यात सर्व स्तरावर छिंदमचा निषेध करण्यात आला होता. त्यानंतर छिंदमने व्हिडिओ प्रसारित करुन माफीनामा मागितला. छिंदमने मी निर्दोष असून राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं अर्जात म्हटलं आहे. त्याचबरोबर, “मी घरातील एकमेव कर्ता पुरुष आहे. आई आजारी असून, दोन लहान मुले असल्यानं देखभालीसाठी जामीन मिळावा.” अशी विनंती केली होती.

Shivjal