‘भाजपा-राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून छिंदमने सेनेला मतदान केले’

अहमदनगर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये भाजपने नाट्यमय रित्या आपला उमेदवार निवडून आणला आहे. राष्ट्रवादीने साथ दिल्याने भाजपचे बाळासाहेब वाकळे हे महापौर पदी निवडून आले आहेत.

निवडणूक सुरू झाली तेव्हा मतदानाच्या प्रक्रियेवर शिवसेनेने आक्षेप घेत बहिष्कार टाकला. पण शिवद्रोही छिंदमने शिवसेनेला मत देतो म्हणून हात वर केला.त्यावेळी शिवसेना नगरसेवक संतापले आणि आम्हाला तुझे मत नको असे म्हणत त्याला सभागृहातच चोप दिला.

भाजपा व राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून छिंदमने सेनेला मतदान केले आमचे ते मत नाही असे शिवसेनेच्या वतीने योगिराज गाडे यांनी स्पष्ट केले. तसेच आपण निवडणुकीच्या आधीच छिंदमचे मत शिवसेनेला पडल्यास ग्राह्य धरू नये अशी विनंती प्रशासनाला केली होती असे स्पष्ट सांगितले.भाजपा व राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून छिंदमने सेनेला मतदान केले असल्याचा शिवसेनेने केला आहे.

You might also like
Comments
Loading...