fbpx

छिंदम आला आणि २० ते २५ जणांविरोधात गुन्हे दाखल करून गेला

shripad (1)

अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपाचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला पोलीस प्रशासनाने पंधरा दिवसांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तसेच त्याला १६ एप्रिलपर्यंत त्याला जिल्हाबंदी करण्यात आली आली. दरम्यान, श्रीपाद छिंदम याने रविवारी रात्री २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

छिंदमने शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छिंदम याचे दिल्ली गेट परिसरातील कार्यालय व त्याच्या घरासमोर लावलेल्या मोटारसायकलची तोडफोड केली होती. त्यामुळे छिंदमने रविवारी रात्री २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे

छिंदमला राज्यातून तडीपार करण्याच्या मागणीसाठी शिवप्रेमींच्यावतीने उद्या मंगळवारी शहरातून शिवसन्मान मोर्चा काढण्यात येणार आहे. छिंदम या विषयावरून शहरात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी छिंदमला पोलीस प्रशासनाने १५ दिवसांसासठी जिल्हा बंदी केली आहे.

छिंदमने दाखल केलेल्या तक्रारी, पोलीसांनी रोहित गुंजाळ, राजेंद्र नारायण दांगट, स्वप्निल दगडे, गोरख दळवी, योगेश देशमुख, भावड्या अनभुले, विरेश तवले,धनंजय लोकरे, बाबासाहेब रोहकले, धनवान दिघे, चेतन शेलार, हरिष भांबरे, गिरीष भांबरे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.