छिंदमला पुणे बार असोसिएशनचा झटका! वकील पत्र स्वीकारणार नाही 

श्रीपाद छिंदम

पुणे : शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याची महापौरपदावरून व नगर भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. तर त्याला दुसरा झटका पुणे जिल्हा बार असोसिएशनने दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे छिंदमच वकीलपत्र घेण्यास पुणे बार असोसिएशनने नकार दिला आहे.

श्रीपाद छिंदम हा अहमदनगर महापालिकेचे निलंबित उपमहापौर आहे. छिंदमने त्याच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्याची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला होता. त्यानंतर छिंदम ची महापौर पदावरून वर नगर भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. पोलिसांनी त्याला अटक करून नाशिक कारागृह हलवले आहे.

छिंदमचा संपूर्ण राज्यातून निषेध व्यक्त होत आहे. त्याचे वकीलपत्र जिल्ह्यातील कोणत्याही वकिलाने न घेण्याचा ठराव पुणे जिल्हा बार असोसिएशनने एकमताने मंजुर केला असल्याची माहिती अध्यक्ष ऍड. राजेंद्र दौंडकर यांनी दिली आहे. अहमदनगर बार असोसिएशनने यापूर्वीच हा ठराव पास केला आहे. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. जेलमध्येही इतर कैद्यांनी छिंदम याला मारहाण केली होती. त्यामुळे त्याची रवानगी नाशिक रोड कारागृहात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा बार असोसिएशनने नुकतीच सभा घेतली. या सभेमध्ये छिंदम याच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.