fbpx

छगन भुजबळांच्या ‘या’ व्हॉट्सअॅप डीपीची झाली होती राज्यभर चर्चा

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र सदन घोटाळा आणि त्यातून मिळालेली बेहिशोबी मालमत्ता याप्रकरणी १ फेब्रुवारी २०१६ रोजी ईडीनं समीर भुजबळांना अटक केली होती. समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर छगन भुजबळांनी आपला व्हॉट्सअॅप डीपी बदलला होता. भुजबळांच्या या व्हॉट्सअॅप डीपीची चर्चा केवळ नाशिकमध्येच नव्हे तर राज्यभर रंगली होती. जेव्हा तुम्ही लोकांवर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो हे दाखवणारा तो डीपी होता.

जेव्हा समीर भुजबळ यांना अटक झाली तेव्हा, भुजबळांच्या व्हॉटस अॅप वरील प्रोफाईल फोटो बदलला, हा फोटो होता, ‘पाठीत खंजीर’ खुपसण्याचा. व्हॉटस अॅप स्टेटस आणि फोटो अनेक वेळा बरंच काही बोलून जातो, भुजबळांनी लावलेला फोटोही तसा बोलका होता. समीर भुजबळ यांच्या काही जवळच्या आणि व्यावसायिक भागीदारांनी त्यांना फसवल्याची देखील चर्चा होती.भुजबळांच्या या व्हॉटस अॅप डीपीचा रोख त्यांच्याकडेच असेल असे अंदाज लावले जात होते तर दुसरीकडे राष्ट्रवादी मधील काही नेत्यांकडे हा रोख असावा अशी चर्चा होती.

भुजबळांनी पाठीत खंजीर खुपसतानाचा डीपी आपल्या व्हॉट्सअॅपवर ठेवला होता. ‘what u get when u trust people’ असं देखील या फोटोवर लिहलेलं आहे त्यामुळे भुजबळ यांनी हा डीपी का ठेवला ? भुजबळांच्या पाठीत खंजीर नेमका कुणी खुपसला? या प्रश्नांची उत्तरे आता कदाचित भुजबळचं देऊ शकतील.

दरम्यान, काल छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भुजबळांना दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी 9 वेळी जामीनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते मात्र त्यांना यश येत नव्हतं.शेवटी आज त्यांना जामीन मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. 5 लाखांच्या जात मुचलक्यावर न्यायालयानं त्यांना जामीन दिला आहे.

 

3 Comments

Click here to post a comment