fbpx

नक्षलवाद्यांचा धुडगूस : बस जाळून केली निवृत्त पोलिसाची हत्या

chhattisgarh naxal attack

टीम महाराष्ट्र देशा- छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी सोमवारी मध्यरात्री महामार्गावर अक्षरश: धुडगूस घातल्याचं चित्र पहायला मिळालं. माओवाद्यांनी वाहनांसह जगदलपूरवरुन हैदराबादकडे जाणाऱ्या तेलंगण परिवहन मंडळाची बस पेटवून दिली तसेच बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचीही माओवाद्यांनी हत्या केली.जवळपास दोन तास माओवाद्यांचा हा धुमाकूळ सुरु होता, असे समजते.

शुक्रवारी तेलंगण सीमेवर छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी माओवाद्यांवर कारवाई केली होती. या चकमकीत १० माओवादी ठार झाले. तर एक जवान शहीद झाला होता. कदाचित याच घटनेच्या रागातून हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे. छत्तीसगडमध्ये दोरनापाल गावाजवळ मध्यरात्री १०० पेक्षा जास्त माओवादी सुकमा- हैदराबाद महामार्गावर आले. त्यांनी महामार्गावर तीन बसेस आणि तीन ट्रक जाळले. यातील एका बसमध्ये पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी प्रवास करत होता. माओवाद्यांनी त्याची हत्या केली.