छत्रपती उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना नाव न घेता लगावला टोला !

सातारा : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्ही गट नेहमी एकमेकांविरोधात उभे असतात. दरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाकरी खाणारा भलता असं म्हणणाऱ्यांना आम्ही केवळ विकासाकामांतूनच उत्तर देऊ, असा इशारा दिला.

छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा पालिकेच्या भुयारी गटर योजनेसह कोटेश्वर पुल आणि सुमित्राराजे उद्यान पुलाच्या रुंदीकरणाच्या कामांचा शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. छत्रपती उदयनराजे म्हणाले, नुसती आश्वासने देऊन आम्ही जनतेची फसवणूक करत नाही. सातारा विकास आघाडी जाहीरनाम्यानुसारचं विकासकामे करीत आहे. असे स्पष्ट केले.