छत्रपती उदयनराजे भोसले यांनी थोपटली बाला रफिकची पाठ

टीम महाराष्ट्र देशा : २०१८ यावर्षी महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरलेला बाला रफिक याने खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन भावी वाटचालीसाठी आशीर्वाद घेतले आहेत. ही भेट सातारा येथील जलमंदिर या उदयनराजे यांच्या निवासस्थानी झाली.

जालना येथे झालेल्या महारष्ट्र केसरी स्पर्धेत बाला राफिक याने अभिजित कटके याचा पराभव करून महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. बाला रफिक हा अत्यंत गरीब कष्टकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तसेच बाला रफिक याने त्याच्या वडिलांचे स्वप्न स्वतःच्या कर्तृत्वाने पूर्ण केले त्यामुळे त्याची अनेककाकडून पाठ थोपटली जात आहे.

उदयन राजे यांनी देखील बाला रफिकचे कौतुक केले व भावी वाटचाली साठी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. याआधी बाला राफिक याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मनसे अध्यक्ष राज ठाकरे , भाजप नेते सुभाष देशमुख तसेच अन्य नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या.