भाजपच्या मुखात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि ह्रदयात छिंदम- अशोक चव्हाण

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपच्या मुखात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि ह्रदयात छिंदम हा भाजपचा दुटप्पी चेहरा जनता ओळखून असल्याची टीका केली.

भाजपच्या ३८ व्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईत महामेळाव्याच आयोजन करण्यात आलं होत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन करण्याच्या दृष्टीने पक्षाने या मेळाव्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देवून जोरदार घोषणा बाजी केली. आपल्या भाषणातून त्यांनी विरोधकांवर चांगलेच फटकारे ओढले.

अशोक चव्हाण म्हणाले, मुखात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि ह्रदयात छिंदम हा भाजपचा दुटप्पी चेहरा जनता ओळखून आहे. यांनी आरक्षण हटवू देणार नाही असे कितीही म्हटले तरी मोहन भागवतांनी संघ आणि भाजपचे आरक्षण विरोधी मत अगोदरच प्रदर्शित केल्याचे त्यांनी सांगितले. अमित शहा यांनी आरक्षण हटवणार नाही आणि हटवू देखील देणार नाही. असे, विधान केले होते.

You might also like
Comments
Loading...