छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही…

Narendra Modi salutes a statue of Chhatrapati Shivaji

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातच नाहीतर जगभरात ज्यांची जयंती साजरी केली जाते. असे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी राजाला विनम्र अभिवादन केले आहे. तसेच शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही असे गौरव उद्गार काढले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूर महान व्यक्तीमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे. तसेच राष्ट्रनिर्माणाची मुहूर्तमेढ महाराजांनी जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वीच रोवली होती. पिढ्यानपिढ्या महाराज आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. हेसुद्धा तितकच खरं आहे, पुन्हा शिवाजी होणे नाही.

शिवाजी महाराजांच्या रुपात पुन्हा असा राजा झाला नाही तरी शिवाजी ऐवजी देशातील सव्वाशे कोटी जनतेला त्यांनी ‘सेवाजी’ होण्याचे आवाहन केले. स्वराज्य निर्मिती करतांना निस्वार्थ राजकारण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महारांजाच्या जयंती निमित्त अनेक राजकीय मंडळी शिवाजी महाराजांना अभिवादन करत आहेत.