छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करावे : प्रवीण गायकवाड

पुणे : मराठा आरक्षणाचे आंदोलन सध्या चिघळत आहे. अनेक मराठा संघटना पेटून उठल्या आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन या सर्व मराठा संघटनांचे नेतृत्व करावे असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रावीण गायकवाड यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील छत्रपती संभाजीराजे किंवा उदयनराजेंनी मराठा बांधवांसाठी पुढाकार घ्यायला हवा, तसेच छत्रपतींच्या घराण्यातील एकही व्यक्ती या आंदोलनात उतरले तर महाराष्ट्रातील सर्व मराठा संघटना त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

मराठा क्रांती मोर्चा : उद्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे बंदची हाक

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.