छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शिवमूर्तीस सुवर्णनाण्यांचा अभिषेक होताच…

किल्ले रायगड : “अंधार फार झाला आता दिवा पाहिजे , अफजलखान फार झाले आता एक जिजाऊंचा शिवा पाहिजे . शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला , दहा दिशांच्या तेजातून अरुणोदय जाहला . ‘जय भवानी!!, जय शिवाजी !!!.”

bagdure

आज बुधवार (६ ) सकाळी खासदार छत्रपती संभाजी राजे यांचे ढोलताशांच्या गजरात रायगडावर आगमन झाले. त्यांच्या हस्ते राजसदरेवर शिवराज्याभिषेकाला सुरवात करण्यात आली. यावेळी युवराज शहाजीराजे, पशु व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर उपस्थित होते.

शिवरायांचा राज्याभिषेकाचा ३४५वा वर्षसोहळा आज उत्साहात साजरा झाला. ढोल-ताशे, लेझीम आणि पोवाडय़ांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराजांना या वेळी मानवंदना देण्यात आल्या. आज रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवमूर्तीस सुवर्णनाण्यांचा अभिषेक होताच उपस्थित शिवभक्तांनी ‘जय भवानी!!, जय शिवाजी !!!.” चा केलेल्या घोषणेमुळे रायगडावर शिवमय वातावरण निर्माण झाले होते.

You might also like
Comments
Loading...