fbpx

तुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा

तुळजापूर : छत्रपती संभाजी महाराज की जय …जय भवानी जय शिवाजी …आई राजा उदे उदे सदानंदीचा उदो… अशा घोषणांनी संभाजी महाराज परिसर दणाणून निघाला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने तुळजापूर शहरातील विविध संस्थांच्या वतीने संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

प्रथमता छञपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कुंकवाची उधळण करीत जयघोष करण्यात आला .याप्रसंगी छावाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी बोलताना म्हणाले, ‘छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आपण सर्व तरुणांनी घेऊन हिंदू धर्माची पताका पुढे नेऊ या,असे मत त्यांनी व्यक्त केले. अमोल कोल्हे यांच्या संभाजी महाराज मालिकेमुळे नवीन पिढीला संभाजी महाराजांचे चरित्र चांगल्या पद्धतीने पहावयास मिळत आहे असे सांगून संभाजी महाराजांच्या आदर्श आपण सर्वजण घेऊन जीवनामध्ये काम करू असेही ते म्हणाले.यावेळी श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ, छावा, संभाजी ब्रिग्रेड, शिवभवानी प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अदि पक्षाने यावेळी अभिवादन केले.