छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो ‘संपला’ ! वाचा काय आहे प्रकरण

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हेवी वेट नेते आणि महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात जो गेला तो संपला हे म्हटले जायचे.याचाच अजून एक प्रत्यय नाशकात आला आहे.तो भुजबळांवर सतत राजकीय आरोप करणारे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, शिवसेना नेते शिवाजी चुंभळे यांच्या विरूद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.

मागचे अडीच वर्षे सभापती असलेले चुंभळे पोलिस तक्रारी, संचालकांसह कर्मचाऱ्यांबरोबर मारामाऱ्यांमुळे सतत वादग्रस्त ठरले होते.राज्यातील आघाडीच्या मानल्या गेलेल्या नाशिक बाजार समितीच्या संचालकांनी शिवाजी चुंभळे यांच्या विरोधात बंड पुकारले होते.

Loading...

जिल्हा उपनिबंधकांकडे केलेल्या तक्रारी नुसार त्यांचे सह्यांचे अधिकार काढून ते संचालक संपतराव सकाळे यांच्याकडे देण्यात आले होते. सभापतीपदावरून चुंभळे यांना काढण्यासाठी अविश्वासाचा ठरावासाठी संचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र दिले. त्यावेळी हे संचालक व चुंभळे यांच्यात मारामारी झाली होती.

यावेळी चुंभळे व त्यांच्या निकटवर्तीयांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अप्रत्यक्षपणे त्रास दिला जात असल्याचा आरोप केला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह सर्वच नाराज संचालक एकत्र आल्याने काल अविश्वास ठराव मांडण्यात आला.त्या ठरावावेळी ते तिकडे फिरकलेही नाही.

पावणे अकराच्या सुमारास बैठक सुरू झाली तेव्हा संचालक हजर होते. चुंभळे बैठकीला आले नाही. अविश्वास ठराव मंजूर झाल्याने चुंभळेना पायउतार व्हावे लागले. अविश्वासाचा ठरावासाठी मतदान होणार असल्याने बाजार समितीच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर ही प्रक्रिया पार पडली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं