नाशिकच्या विकासासाठी छगन भुजबळांचे जेलमधून चंद्रकांत पाटलांना पत्र

लासलगाव: नाशिक जिल्ह्यातील प्रकाशा-लासलगांव-विंचूरटा रामा क्र.७ या रस्त्यावर लासलगांव रेल्वे उड्डाणपूल बांधणे, वळणरस्ता व उड्डाणपुलाच्या पोहोच मार्गाच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी राज्याचे माजी उंत्री आ. छगन भुजबळ यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या लेखी पत्रात म्हटले, आप्रकाशा-लासलगांव-विंचूर-भरवसफाटा रामा क्र.७ या रस्त्यावर लासलगांव रेल्वे उड्डाणपूल बांधणे, वळणरस्ता व उड्डाणपुलाचा जोडरस्ता या कामाला शासन निर्णय दि.१४ फेब्रुवारी २००८, दि.३१ ऑक्टोबर २००९ व दि.२७ नोव्हेंबर २०१२ अन्वये प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. उड्डाणपूल, वळणरस्ता व उड्डाणपुलाचा पोहोच मार्ग या कामाच्या वावातील उड्डाणपुलाचे बांधकाम हे रेल्वे विभागामार्फत पूर्ण झालेले आहे. लासलगाव वळण रस्त्यासाठी व उडडाणपुलाच्या जोडरस्त्यासाठी एकुण ४.८०० किमी लांबीकरीता दोन टप्प्यात भुसंपादनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

पहिल्या टप्प्यात राज्यमार्ग क्र.२९ ते टाकळी विंचुर ते रामा क्र.७ पर्यंतच्या (२.५७० किमी) रस्त्याचा भुसंपादन प्रस्ताव तयार करण्यात आला. लासलगाव शिवारातील जमिनीचा ताबा (१.१८ हेक्टर) मिळाल्यामुळे नविन रस्त्याचे 0.८७० किमी लांबीचे डांबरीकरणाचे काम पुर्ण करण्यात आले आहे.टाकळी विंचुर शिवारातील भूसंपादनासाठी वाढीव दराने रक्कम अदा करण्याकरीता एकूण २६८१.५८ लक्ष तर रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी किमतीत रु.३८९.६९ लक्ष सुधारीत अंदाजपत्रकाप्रमाणे वाढ झालेली आहे. तसेच टप्पा-२ रा.मा २९ ते विंचूर (२.२३० कि.मी) साठी ४.५८५ हेक्टर जमिनीचा भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी,नाशिक यांचेकडे पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावासाठी मा.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,निफाड यांनी टाकळी विंचूरसाठी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे या प्रस्तावाची किंमत रु.६०३.९३ लक्ष खर्च अपेक्षित आहे.