fbpx

छगन भुजबळांचा मुलगा उद्धव ठाकरेंच्या भेटीला !

टीम महाराष्ट्र देशा : छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात पंकज भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून छगन भुजबळ यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला होता. तर महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा झालाच नसल्याची भूमिका शिवसेनेने पूर्वीपासून घेतलेली आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांना जामीन मिळण्यापूर्वी समीर भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आता जामीन मिळाल्यानंतर समीर यांनी उद्धव ठाकरे यांचा वेळ मागताच उद्धव ठाकरे यांनी भेटीला वेळ दिला आहे. सामना मधील सहानभूतीच्या भूमिकेनंतर या भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. थोड्याच वेळात या भेटीचा तपशील बाहेर येण्याची शक्यता आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात