‘महिनाभरानंतर भेटून बोलू’ – उद्धव ठाकरे

मुंबई – महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात सुमारे सव्वादोन वर्षे छगन भुजबळ तुरुंगात होते. भुजबळ याना जामीन मिळाल्यानंतर त्यांची सुटका झाली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी बुधवारी भुजबळ यांच्या सांगण्यावरून ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘तब्येतीची काळजी घ्या, कुटुंबीयांसोबत राहा, महिनाभरानंतर भेटून बोलू’, असं यावेळी उद्धव ठाकरे पंकज भुजबळ यांना म्हंटल्याचं वृत्त आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

दरम्यान उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यात वाढत असलेल्या जवळीकतेने भुजबळ शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा देखील रंगत आहे. तसेच भुजबळ जेलमध्ये असताना देखील उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भुजबळ यांची बाजू घेतली होती. त्यामुळे भुजबळ आता घरवापसी करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान पंकज भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली.

Shivjal