वाचा : एकेकाळी भाजीपाला विकून गुजराण करणाऱ्या भुजबळांच्या कोट्यावधींच्या मालमत्तेची यादी

chagan bujbal

टीम महाराष्ट्र देशा- जामीन मिळाल्याने आता गेली दोन वर्षापासून तुरुंगात असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.काल छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी छगन भुजबळांची चौकशी सुरू झाल्यावर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. हे छापासत्र सुरू झाल्यावर भुजबळांची संपत्ती आणि मालमत्ता यांची माहिती समोर आली होती . ACBनं दिलेली यादी हि यादी वाचून भल्याभल्यांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही .

भुजबळ कुटुंबियांच्या कंपन्या-
आर्मस्ट्रॉंग एनर्जी प्रा.ली.,भुजबळ वाईन्स प्रा.ली.,आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ली.,आर्मस्ट्रॉंग प्युअर वॉटर सर्विस प्रा.ली.,भुजबळ वाईनरी प्रा.ली.,भावेश बिल्डर्स प्रा.ली.,चंद्राई वाईनरी,ग्रोथ इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ली.,देवीश इन्फ्रास्ट्रक्चर,इंटेलेक्च्युअल मॅनेजमेंट प्रा.ली. ,निश इन्फ्रास्ट्रक्चर ,मेलन वाईनरी प्रा.ली.,रुबेरे एक्स इंडस्ट्रीज, शिराज विनियार्डस प्रा.ली., सुवि रबर प्रा.ली. परवेश कंन्स्त्रक्षण.

भुजबळांचे प्रकल्प,
इंडोनेशियामध्ये कोळशाची खाण,सिंगापूर येथे गुंतवणूक,नाशिक येथे पॉवर प्लांट,हॅक्स वल्ड मेगा पॉवर प्रोजेक्ट ,वांद्रे येथे १५० कोटींचा गृहनिर्माण प्रकल्प,

भुजबळांनी जमवलेली संपत्ती आणि तिचे मालक –

नाशिक – चंद्राई बंगला, भुजबळ फार्म ,मिना भुजबळ, ४००० चौ.फू. बंगला
भुजबळ पॅलेस, भुजबळ पंकज भुजबळ, ४६५०० चौ.फू. बंगला. किंमत अंदाजे १०० कोटी. २५ खोल्या, स्विमिंग पूल व जीम.
येवला ,पंकज भुजबळ ,५००० चौ.फू. ११ खोल्या
नमाड येथे बंगला, ऑफिस ३००० चौ.फू., पाच खोल्या
राम बंगला समीर भुजबळ १५०० चौ.फू.

मुंबई
सुखदा को.ऑ.हौ.सो. वरळी ,छगन भुजबळ ,२००० चौ.फुटांचे घर, टोयोटा कॅमरी कार
मिलेशिया अपार्टमेंट, माझगाव ,छगन भुजबळ ,६०० चौ.फुटांची तीन घरे
माणिक महल चर्चगेट, ५वा मजला ,पंकज भुजबळ ,१२०० चौ. फुटांचे घर
माणेक महल, ७वा मजला मिना , छगन भुजबळ ,१२०० फुटांचे घर (भाड्याने दिलेले)
सागर मंदिर को.ऑ.हौ.सो., हिराबाई मगन भुजबळ ,६०० चौ. शिवाजी पार्क फुटांचे घर
साईकुंज बिल्डिंग, दादर (पू.) ,विशाखा भुजबळ ,१५०० चौ. फु. घर, शेफाली भुजबळ, (१२०० चौ. फू.), हिराबाई भुजबळ ,(१५०० चौ.फू.), मिना भुजबळ, (१२०० चौ.फू.),
ग्रोथ इन्फ्रा, दुकान (१५०० चौ.फू.)
सॉलिटेअर बिल्डिंग, समीर भुजबळ ,संपूर्ण पाचवा माळा, एस.व्ही. रोड, सांताक्रूझ २५०० चौ.फू.घर
पंकज भुजबळ, सातवा माळा, २५०० चौ.फू. घर
मिना भुजबळ आठवा मजला २५०० चौ.फू. घर

ठाणे
पी एच ७, मारुती पंकज भुजबळ, १३५० चौ.फू. घर, एनक्लेव्ह को. ऑ. सो. तसेच ए विंगमध्ये भुजबळ ग्रुप कंपनीचे एक घर
मारुती पॅराडाइज को.ऑ.हौ. दुर्गा भुजबळ १३०५ चौ.फू.घर
सो.बी-विंग. सीबीडी बेलापूर
मारुती पॅराडाइज को.ऑ. हौ. भुजबळ ग्रुप एकूण नऊ गाळे, सी-विंग. सीबीडी बेलापूर त्यातील दोन भाड्याने तर सात बंद.
एव्हरेस्ट को.ऑ.हौ. पंकज भुजबळ १३०० चौ.फू.घर
सोसायटी सीबीडी बेलापूर
लाजवंती बंगला, मिना भुजबळ १३०० चौ.फू. घर
सीबीडी बेलापूर

पुणे
लोणावळा, मु.पो. आवतन पंकज भुजबळ, २.८२ हेक्टरजागेत समीर भुजबळ सहा बेडरूमचा अलिशान बंगला, परदेशी फर्निचर, प्राचीन मूर्ती, स्विमिंग पूल, हेलिपॅड, शेततळे, तीन नोकरांची घरे, सुरक्षा रक्षकांकरिता पाच खोल्या, अंदाजे पाच कोटी किमतींची फळझाडांची लागवड.
ग्राफीकॉन आर्केड, समीर भुजबळ घर,संगमवाडी फ्लॅट नं. २०८,तिसरा माळा, प्लॉट नं. १५३,