छगन भुजबळांच्या जामीन अर्जावर आज निर्णय

मुंबई  : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात असलेल्या छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज (सोमवार) निर्णय होणार आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम़ एस़ आजमी यांच्यासमोर भुजबळांच्या जामीनावर सुनावनी होणार आहे.

दरम्यान, छगन भुजबळ आणि त्यांचा मुलगा समीर भुजबळ यांनी जामिनासाठी पीएमएलए न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडे अनेकदा केलेले अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. पण, सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार, पीएमएलए कायद्यातील कलम 45 (1) असंविधानिक असून, ते रद्द झाले आहे. त्यामुळे रद्द झालेल्या या कलमाचा आधार घेत भुजबळ यांनी पुन्हा एकदा न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर सोमवारी निर्णय घेतला जाणार आहे.

You might also like
Comments
Loading...