छगन भुजबळ यांचा जामीनअर्ज कोर्टाने फेटाळला

भुजबळांना दिलासा नाहीच

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता पण विशेष पीएमएलए न्यायालयाने भुजबळांचा अर्ज फेटाळला आहे.

दरम्यान, छगन भुजबळ आणि त्यांचा मुलगा समीर भुजबळ यांनी जामिनासाठी पीएमएलए न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडे अनेकदा केलेले अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले होते. पण, सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार, पीएमएलए कायद्यातील कलम 45 (1) असंविधानिक असून, ते रद्द झाले आहे. त्यामुळे रद्द झालेल्या या कलमाचा आधार घेत भुजबळ यांनी पुन्हा एकदा न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केल होता, त्यावर सोमवारी कोर्टाने आपला निर्णय देत छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.