‘या’ बड्या नेत्याची शिवसेनेत घरवापसी, छगन भुजबळांची चिंता वाढली

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. प्रामुख्याने हे पक्षांतर कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. तर आता एका भाजप नेत्यानी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. येवला-लासलगाव मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. २०१४च्या निवडणुकीत तिकीट नमिळाल्याने कल्याणराव पाटील यांनी नाराज होऊन भाजपात प्रवेश केला होता. मात्र आता कल्याणराव पाटील यांनी पुन्हा घरवापसी केली आहे.

आज मुंबई येथे कल्याणराव पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद काही अंशी वाढली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शह देण्यासाठी शिवसेना आता सरसावली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमध्ये येवला-लासलगाव मतदारसंघात तुल्यबळ लढत पहिला मिळणार आहे.

दरम्यान कल्याणराव पाटील येवला-लासलगाव मतदारसंघाचे १० वर्ष आमदार होते. त्यांनी २००४ ला येवला – लासलगाव मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करत भूजबळ यांना तगडी लढत दिली होती. असाच प्रयत्न त्यांचा २०१४ला देखील होता मात्र शिवसेनेने त्यांना डावलत तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य संभाजी पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज होत कल्याणराव पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र आता पाटील पुन्हा शिवसेनेत आले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

येत्या 13 ऑगस्टला राज्यात अजून एक राजकीय बॉम्बस्फोट होणार : चंद्रकांत पाटील

खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आता भाजपात दाखल झाले आहेत’

रोहित पवारांच्या उमेदवारीला गटबाजीचे विघ्न, घोंगावतंंय दुहेरी संकट