fbpx

नागपुरात आज धडाडणार भुजबळांची तोफ

टीम महाराष्ट्र देशा : सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली प्रदीर्घ काळ कारागृहात काढल्यानंतर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे आज, रविवारी सायंकाळी ५ वाजता नागपुरात आगमन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

आगमनानंतर ते विमानतळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करतील. यानंतर त्यांचे छोटेखानी भाषण होणार आहे. भुजबळ त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार गुरुवारी येणार होते. मात्र, प्रकृतीमुळे त्यांचा दौरा तीन दिवस लांबला. एरवी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे भुजबळ पावसाळी अधिवेशनात कसा करिश्मा दाखतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.