नाशिक: पालकमंत्री छगन भुजबळ आज निफाड तालुक्यातील लासलगाव येथे एका कार्यक्रम प्रसंगी आले होते. यावेळी भुजबळ म्हणाले की “महाविकास आघाडीची सत्ता ही पाच वर्षे टिकणार असून पुढेही आम्ही एकत्र लढल्यास भाजपने महाराष्ट्राची सत्ता विसरावी”. तसेच इम्तियाझ जलील हे एमआयएम चा राजीनामा देऊन आले तर त्यांना पक्षात घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी राष्ट्रवादीच्या धोरणाप्रमाणे काम करावं नक्कीच पवार साहेब त्यांना राष्ट्रवादी घेतील असे भुजबळ यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे, अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सोनिया गांधी पवार साहेब यांचे महाविकास आघाडीचे सरकार निश्चितपणे पाच वर्षे टिकणारे असून पाच वर्षानंतर हे तीन पक्ष एकत्रित लढले तर भाजपने महाराष्ट्रातील सत्ता विसरला हरकत नाही. असे भुजबळ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: