मुंबई : आज (१ मे ) महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असून या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून यावरच राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना छगन भुजबळ म्हणाले की,‘कुणाला काय बोलायचं तर बोलूद्या. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना बोलण्याचा, सभा घेण्याचा, भाषण करण्याचा अधिकार आहे.’ तसेच आपली मतं मांडा पण त्यातून राज्यापुढं अडचणी निर्माण होणार नाहीत, जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या, असे भुजबळ म्हणाले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. तसेच राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आणखी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “महाराष्ट्र स्थापनेस ६२ वर्षे झाली तरी मुंबई कुणाची?”, संजय राऊत यांचा सवाल
- “…हा महाराष्ट्राचाच अपमान”, पंतप्रधान मोदींवर संजय राऊत यांची टीका
- “महाराष्ट्राच्या भूगर्भात मुंबई तोडण्याबाबत…”, संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य
- IPL 2022 RR vs MI : राजस्थानचं मुंबई इंडियन्सला १५९ धावांचं आव्हान; बटलरचं अर्धशतक!
- IPL 2022 RR vs MI : हुश्श..जिंकलो! रोहितला मिळालं बर्थडे गिफ्ट; मुंबई इंडियन्सचा पहिला विजय!