Share

Chhagan Bhujbal । “भारत जोडोचा उद्देश चांगला, मात्र राहुल गांधींनी…”; छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal । नाशिक :  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेत वीर सावरकर यांच्यावर टीका केली. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.  तुरुंगात असताना भीतीपोटी माफीनाम्यावर स्वाक्षरी करून सावरकरांनी ब्रिटीशांना मदत केली आणि महात्मा गांधी आणि इतर समकालीन भारतीय नेत्यांचा विश्वासघात केला, असा दावा राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) उद्देश चांगला आहे. आतापर्यत माध्यमे यात्रेकडे फिरकत नव्हते. आता, राहुल गांधींच्या बोलण्यामुळे वृत्तवाहिन्या किमान यात्रेला दाखवू लागले आहेत. सावरकर यांच्याबद्दल आदर आहे, मात्र त्यांचा राजकारणासाठी वापर होतोय.” त्यांनी कारावास भोगला, याबाबद्दल आदर आहे. सावरकरांनी नागरिकांना उपदेशपर संदेश दिले असून गाय उपयुक्त पशु आहेत, या सावरकरांच्या शास्त्रीय विचारांचा अंगीकार करा, असेही भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या महाविकास आघाडीत फूट पडण्याच्या विधानावर छगन भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडी यांच्यात एक समान धागा आहे. ते दोघेही आपापल्या आयडियॉलॉजी सांभाळत आहेत. भाजपला दूर ठेवणे हा अजेंडा होता. त्यामुळे आम्ही एकत्र आहोत, प्रत्येक जण आपलं मात मांडायला मोकळा असल्याचे भुजबळ म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती. त्यांनी काँग्रेसविरोधात ब्रिटिशांसोबत काम करण्याचं मान्य केलं होतं. तसेच, ते ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केली आहे.

Chhagan Bhujbal । नाशिक :  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेत वीर सावरकर यांच्यावर टीका केली. त्यामुळे राजकीय …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nashik Politics

Join WhatsApp

Join Now