मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून निवडला जाईल. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेतून सरपंच निवडण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. सध्या ग्रामपंचायतींच्या सदस्यांमधून सरपंच निवडला जातो. दरम्यान विरोधक सरकारच्या निर्णयावर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारला टोला लगावला आहे. सरपंच जनतेतून पाहिजे मग मुख्यमंत्री फुटलेल्या आमदारातून का, असा सवाल भुजबळ यांनी केला.
तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सरकारवर टीका केली. जनतेतून फक्त नगराध्यक्ष आणि सरपंच कशाला तुम्ही राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच करा, असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सरकारवर केला. दोघांच्या मंत्रीमंडळाला खूप घाई झालेली दिसते अशी टीकाही त्यांनी केली.
नगरपरिषदेचे अध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य सरकारने यात आणखी एक तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे की, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर दोन वर्षे आणि पुढील निवडणूकी आधी सहा महिने आधी सरपंच आणि उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणता येणार नाही.
तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरे अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करून नगरपरिषदेचे अध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 2017 मध्ये फडणवीस सरकारने थेट सरपंचाच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, 2020 मध्ये, ठाकरे सरकारने हा निर्णय बदलला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Gunratna Sadavarte | “काँग्रेसच्या जातीय विचारांची मी निंदा करतो” – गुणरत्न सदावर्ते
- Chandrakant Patil : देवेंद्र फडणवीसांनी बदला नावाचा एक पोर्टफोलिओ उघडावा – चंद्रकांत पाटील
- Chhagan Bhujbal | काय पाऊस, काय पूर, काय खड्डे, समद ओक्के ; भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर टीका
- Virat Kohli : “कोहलीला ‘या’ कारणामुळे बीसीसीआय संघातून वगळण्याचे धाडसही…”; इंग्लंडच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
- Eknath Khadse : “१५ दिवस झाले तरी हे सरकार अजूनही जेवणावळीतच व्यस्त”; एकनाथ खडसेंचा शिंदे सरकारवर निशाणा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<