भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा : प्रकाश आंबेडकर

prakash aambedkar 1

टीम महाराष्ट्र देशा-  भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांना चौकशीनंतर जामीन मिळायला हवा. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. त्यांना संविधानाने दिलेला तो अधिकार आहे, असे सांगत छगन भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading...

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा, बेनामी तसेच उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. याप्रकरणी ते गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहेत.

 

1 Comment

Click here to post a comment







Loading…










Loading…

Loading...