नाशिक: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालिकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. छगन भुजबळ यांनी स्वत: ट्विट करून आपली कोराना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. तसचे संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
“माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करा,” असे आवाहन छगन भुजबळ यांनी ट्विटमधून केले आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, यात शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता नाशिक शहरात रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, जिल्हाभरात मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करत एक हजार रुपये दंड केला जाणार असून, प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; ५१५ नव्या रुग्णांची भर, ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू
- जालनेकरांनो नियम पाळा; ९६ नवे बाधित रुग्ण, उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू
- परभणीत आढळले २१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; एकाचा मृत्यू
- पनवेलमध्ये मायलेकीचा खून करून फरार झालेल्या आरोपीची हिंगोलीत आत्महत्या
- सासरच्या छळाला कंटाळून विवाविहतेची आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल