fbpx

भुजबळ बाहेर येणार ? छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

chhagan-bhujbal_

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. आज (३० नोव्हेंबर) ला यावर सुनवाई होणार आहे. नुकताच भाजपचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी भुजबळ लवकरच बाहेर येतील अशी अशा व्यक्त केली होती तर सुप्रिया सुळे यांनी भुजबळ निर्दोष असल्याच सांगितल होत.

त्यामुळ आज कोर्टात होणाऱ्या सुनवाईवर सगळ्या राज्यच लक्ष लागल आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील एक मोठे नेते आणि महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा चेहरा म्हणून ओळखले जातात त्यामुळे आजच्या त्यांच्या जमीन अर्जावरील सुनवाईवर सगळ्याचं लक्ष असणार आहे.

मनी लॉड्रिंग अॅक्टमधील कलम ४५ मुळे भारतीय राज्यघटनेने नागरिकांना बहाल केलेल्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाचा संदर्भ देत भुजबळांनी अर्ज केल्याने त्यांना जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.