छगन भुजबळांच्या जामीनअर्जावर १८ डिसेंबरला निर्णय

टीम महाराष्ट्र देशा: मनी लॉड्रिंग अॅक्टमधील कलम ४५ मुळे भारतीय राज्यघटनेने नागरिकांना बहाल केलेल्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाचा संदर्भ देत भुजबळांनी जामीनअर्ज दाखल केला होता. यावर आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून येत्या १८ डिसेंबरला पीएमएलए कोर्ट याबाबत आपला निर्णय देणार आहे.

दरम्यान, भाजप नेते आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी छगन भुजबळ हे लढवय्ये नेते आहेत ते लवकरच बाहेर येतील असा विश्वास व्यक्त केला होता तर सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ हे निर्दोष असल्याच बोलल होत पण आता भुजबळ बाहेर येणार की नाही यावर १८ डिसेंबरलाच फैसाला होणार आहे.

You might also like
Comments
Loading...