छगन भुजबळ यांना योग्य उपचार मिळत नाहीत – धनंजय मुंडे

bhujbal

मुंबई : छगन भुजबळ आजही आमदार आहेत. जेजे रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यावर त्यांना ओपीडीच्या रांगेत उभे रहावे लागते.अँजिओग्राफी, ईसीजीअब नॉर्मल आले तरी डॉक्टर त्यांना जेलमध्ये पाठवा म्हणतात.न्यायदानात जे होईल ते मान्य आहे पण प्रशासन असे का वागत आहे असा प्रशन आज विधानपरिषदेत विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

Loading...

दरम्यान, विधानपरिषदेचे कामकाज सुरु होताच आ. कपिल पाटलांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीचा मुद्दा मांडला उपस्थित केला. तर छगन भुजबळ यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

भुजबळ यांच्या हलाखीच्या परिस्थिती मांडतांना आमदार जयंत जाधव भावनिक झाले.महाराष्ट्र सदन घोटाळ्यासह बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाखाली आर्थर रोड जेलमध्ये असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोटदुखी आणि अस्थमावर उपचार सुरू आहेत.Loading…


Loading…

Loading...