नेहमीप्रमाणे अॅक्टिव्ह राहू नका डॉक्टरांचा छगन भुजबळांना सल्ला

टीम महाराष्ट्र देशा : “स्वादुपिंडाच्या त्रासावर उपचार सुरु आहेत. काही दिवस कुटुंबीयांसोबत राहणार आहे. आराम करेन. अजून पूर्ण बरा झालो नाही.”, तसेच, पहिल्यासारख्ये सक्रीय राहता येणार नाही, अशी अट डॉक्टरांनी घातल्याच राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केल आहे. जवळपास २ वर्षानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. भुजबळ यांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते आपल्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी हे स्पष्ट केल आहे.

त्यामुळे रुग्णालयातून घरी परतल्यावर भुजबळ पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता मावळली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर सुटका झाल्यानंतरही छगन भुजबळ रुग्णालयातच होते. त्यांना आज डिस्चार्ज झाला. त्यानंतर आज तब्बल दोन वर्षानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, प्रत्येकवेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजकीय भाष्य करून विरोधकांना गारद करणाऱ्या भुजबळांनी यावेळी कोणतेही राजकीय भाष्य केलं नाही.

Gadgil