“ईडीच्या एका नोटीसमुळे…”; छगन भुजबळांचा राज ठाकरेंना खोचक टोला
औरंगाबाद : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना छगन भुजबळ म्हणाले की, ‘राज ठाकरे काही वर्षांपूर्वी भाजपच्या विरुद्ध बोलत होते. प्रेस कॉन्फरन्स घेत होते. पण अचानक काय झाले माहित नाही.एका ईडीच्या नोटिसमुळे ताबडतोब त्यांचा ट्रॅक बदलला. ते लगेच महाविकास आघाडीच्या विरुद्ध बोलायला लागले.’ तसेच ते भोंगे काढा वगैरे असे काहीही वक्तव्य करत आहेत, असेही भुजबळ म्हणाले.
दरम्यान, ‘अनेक देशांमध्ये मशिदी आहेत, पण तिथे भोंगे बसवल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? कोणत्या धर्मात भल्या पहाटे उठून भोंगे वाजवण्यास सांगण्यात आले आहे.’ तसेच यापुढे आम्ही मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असे राज ठाकरे २ एप्रिल रोजी पार पडलेल्या जाहीर सभेत म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
- “भाजपकडून मनसेचा फक्त वापर सुरु”, जयंत पाटलांचा दावा
- “इश्क़ में हम तुम्हे क्या बताये…”, मोहित कंबोज यांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा
- IPL 2022 : युझवेंद्र चहलचा कहर..! लखनऊविरुद्धच्या सामन्यात रचला ‘नवा’ रेकॉर्ड; वाचा!
- राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “मी शेवटपर्यंत…”
- “सोमय्या पिता-पुत्रांना जामीन देऊ नका”,मुंबई गुन्हे शाखेची मागणी