Share

Chhagan Bhujbal | “शिवरायांचा इतिहास माहीत नसेल तर…”, छगन भुजबळ लोढांवर संतापले

Chhagan Bhujbal | मुंबई : मंगलप्रभात लोढा यांनी प्रतापगड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेशी केली होती. यावरुन राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी लोढा यांना धारेवर धरलं आहे. अशातच राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

यावेळी, जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहिती नसेल, तर तुम्ही त्यांची तुलना कशाल करता, आणि बोलताच का, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. मंगल प्रभात लोढा यांच्यावर टीका करताना त्यांनी छत्रपती शिवजी महाराज यांचा इतिहास सांगत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना मिर्झाराजे यांना घेऊन गेले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्याला राजासारखी वागणूक मिळत नाही असं ज्यावेळी वाटलं होतं, त्यावेळी शिवाजी महाराज यांनी त्यांचा बोलून अपमान केला. अपमान झाला म्हणून त्यांना अटक झाली असल्याचं देखील भुजबळांनी सांगितलं.

दरम्यान, तरीही छत्रपती शिवाजी महाराज मोघलांच्या तावडीतून बाहेर पडले. आणि या गोष्टीची तुलना तुम्ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर करता पण एकनाथ शिंदे हे मंत्रीच होते, त्यांच्याविरोधात इथे कोण मोघल होते, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Chhagan Bhujbal | मुंबई : मंगलप्रभात लोढा यांनी प्रतापगड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाची तुलना थेट छत्रपती …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics