Share

Chhagan Bhujbal | “पुस्तकावर बंदी घालाल, पण लेखकाच्या लेखणीवर…”; ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’वर भुजबळांनी राज्य सरकारला सुनावलं

Chhagan Bhujbal | मुंबई : कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ (Fractured Freedom) या पुस्तकाचा लेखिका अनघा लेले यांनी मराठीत अनुवाद केलाय. या पुरस्काराला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार जाहीर झाला होता. पण नंतर राज्य सरकारनं तो पुरस्कार अचानकपणे रद्द केला. यामुळे नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.

साहित्य क्षेत्रातून देखील राज्य सरकारवर टीका केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “एखाद्या पुस्तकावर बंदी घालणं तुलनेनं सोपं असतं. पण त्या लेखकाच्या कल्पनाशक्तीवर आणि त्याच्या लेखणीवर कुणी बंदी घालू शकत नाही. कोबाड गांधी यांनी पुस्तकात काय लिहलं आहे, त्यांचा विचार काय आहे? हे कुणी वाचलं आहे का?, असा सवाल त्यांनी केलाय.”

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सर्वच क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आहे. साहित्य क्षेत्रातही सरकारचा हस्तक्षेप वाढतो आहे. सरकारने अशी ढवळाढवळ करू नये. ‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकासाठी जाहीर झालेला पुरस्कार रद्द करून सरकार अघोषित आणीबाणी तयार करत आहे.” त्याचबरोबर फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकाचा पुरस्कार रद्द करणं लोकशाहीला धरून नसल्याचं संजय राऊत म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

Chhagan Bhujbal | मुंबई : कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ (Fractured Freedom) या पुस्तकाचा लेखिका अनघा लेले यांनी मराठीत अनुवाद …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now