Chhagan Bhujbal | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने राज्यात एक नवीन वाद पेटलेला दिसत आहे. आव्हाडांवरील कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे.
ते म्हणाले, “गर्दीत कोणलाही धक्का लागू शकतो. एखाद्यावेळी आपण हात लावून बाजुला सरकायला सांगतो, यात कसला आला विनयभंग?” अशा प्रकारे जर विनयभंगाचे गुन्हे दाखल होत असतील, तर लोकलमध्ये रोज महिलांना धक्के लागल्याच्या घटना घडत असतात, मग त्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा का? आणि जितेंद्र आव्हाडांवर कारवाई केल्याने सरकारची प्रतिष्ठा वाढली आहे का?”, असा सवाल छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्य सरकारला केला आहे.
महाराष्ट्राची ही परंपरा नाही
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीच बदला घेतला असल्याचं वक्तव्य केलं आहे. राजकारणात बदल्याच्या भावनेने कुणीच वागू नये. महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे. इतर राज्यात असे राजकारण होत असेल. मात्र, महाराष्ट्रात अशा राजकारणाला स्थान नाही. महाराष्ट्राची परंपरा सर्वांनीच जपली पाहीजे. सत्ताधाऱ्यांनी चांगले काम केलेल तर आम्हीही सत्ताधाऱ्यांसोबत आहोत.”
तसेच केवळ बदनामी करण्यासाठी गुन्हे दाखल करू नये. जितेंद्र आव्हाडांवर जो गुन्हा दाखल झाला, तो अत्यंत चुकीचा आहे. उलट हे प्रकरण सरकारवरच उलटलेलं आहे. कारण या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वकाही स्पष्टपणे दिसत असल्याचं भुजबळ म्हणाले. “माझं मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना एवढंच सांगणं आहे, तुम्ही दोघंही समजदार आहात. तुम्ही अनेक वर्षांपासून तुम्ही आमच्या बरोबर काम करत आहात. त्यामुळे कोणाविरुद्ध कोणता गुन्हा दाखल करावा, याचं भान ठेवायला हवं.”, असा सल्लाही त्यांनी फडणवीसांना दिला.
महत्वाच्या बातम्या :
- Naresh Mhaske | “हिंदुत्ववादी विचारांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसलं” ; नरेश म्हस्के यांचा संजय राऊतांना सवाल
- IPL 2023 | पोलार्डच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माने शेअर केली पोस्ट, म्हणाला..
- Sushma Andhare | “मी शिवबंधन सोडायला तयार आहे, पण…”; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
- Sushma Andhare | “आमचे एकनाथ भाऊ घरात नसतात ते…” ; सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
- Vivo Mobile Launch | भारतात लवकरच लाँच होणार Vivo चा ‘हा’ Mobile