सरनाईक अर्नब विरुद्ध बोलले तेव्हाच अंदाज आला होता आता यांच्यावर कारवाई होणार – भुजबळ

sarnaik bhujbal

मुबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाचं पथक पोहोचलं आहे. ईडीने नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीचं पथक सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचलं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली. ‘मी सध्या मुंबईच्या बाहेर आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे.

दरम्यान, “पाठीमागच्या काळात मी भाजपविरोधात बोललो तर माझ्या अंगावर केस टाकली. विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवारसाहेबांना ईडीने नोटीस दिली. लोकांना आता माहिती झालंय की भाजपविरोधात कुणी बोललं तर त्यांना त्रास देण्यासाठी संस्थांचा वापर होतो. विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी भाजपकडून संस्थांचा वापर होतोय”, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

तर, अर्णव गोस्वामी प्रकरण, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण तसंच कंगनाच्या प्रकरणात सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपविरोधात जो आक्रमकपणे बोलतो त्याला विविध मार्गाने त्रास दिला जातो. सरनाईकांवरील कारवाईचा मला अंदाज होता. जसं वाटलं तसंच घडलं”, असं भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या