आणि छगन भुजबळ आले जेलच्या बाहेर

छगन भुजबळ आणि रमेश कदमयांची राष्ट्रपती निवडणूक मतदानासाठी एक तास जेलमधून सुटका

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. देशभरातील आमदार . खासदारांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला . राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील तुरूंगाबाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळ हे ऑर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. भुजबळ यांच्या सोबतच राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत आहेत.

bagdure

या दोघांनाही पोलीस बंदोबस्तात तुरुंगाबाहेर आणण्यात आलं, त्यानंतर मतदानासाठी त्यांना विधानसभेत नेण्यात आलं. छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोन्ही नेत्यांचं स्वागत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. राष्ट्रवादीचे इतर नेतेही यावेळी हजर होते.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोघांनीही पीएमएलए कोर्टाकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती केली होती. कोर्टानं ही विनंती मान्य करत या दोघांनाही परवानगी दिली होती. आता मतदानाचा हक्क बजावून झाल्यानंतर या दोघांनाही पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं आहे

You might also like
Comments
Loading...